बाप्पाही आले व्हॉट्सअपवर

 Mazagaon
बाप्पाही आले व्हॉट्सअपवर

इंटरनेटच्या जगात जिथे सर्वांना फेसबुक व्हॉट्सअपने वेड लावले आहे, तिथे बाप्पा तरी कुठे मागे राहणार आहे. भायखळातले याचेच एक उदाहरण इथे राहणाऱ्या आशिर्वाद बिल्डिंगमधील तांबे कुटुंबियांच्या घरी पाहायला मिळत आहे. यांचा बाप्पा चक्क व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करताना दिसत आहे. थर्माकॉल, ग्रीन व्हेलवेट पेपर आणि बाप्पाच्या फोटोची प्रिंट काढून प्रतिक तांबे यांनी हा आकर्षक देखावा निर्माण केला आहे.

Loading Comments