अफवा पसरवणारे दोघे गजाआड

 Malad West
अफवा पसरवणारे दोघे गजाआड

मालाडमध्ये गणेशमूर्तीची तोडफोड केली असून तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची अफवा सोशल नेटवर्किंग साईटवर पसरवणाऱ्या दोघांना कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपी ईश्वर मुलाचंद धुतीया (४३) आणि बोरिवली परिसरातून विजय प्रकाश वंजारा (२१) यांना मुलुंड परिसरातून अटक करण्यात आले . तर अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू असल्याचे  कुरार पोलिसांनी सांगितले. याप्ररकणी पाच आरोपींविरोधात भादंवी कलम १५३ अ,  २९५ अ आणि १२०ब अन्वये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे

 

Loading Comments