कुर्ल्यात रस्त्यावर कच-याचे ढीग

 Kurla
कुर्ल्यात रस्त्यावर कच-याचे ढीग

कुर्ला - कुर्ला परिसरातून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणा-या रस्त्यावर कच-याचे ढीग साचले आहे. येथील नागरिकांकडून कचराकुंडीऐवजी रस्त्यावर कचरा टाकण्यात येत आहे. या कच-यातून दुर्गंधी येत असल्याने परिसरातून जाताना नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे. 

पालिकेने याठिकाणी कचराकुंडी ठेवलेली आहे. मात्र रहिवाशी कचरा कुंडीमध्ये न टाकता तो रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे हा कचरा रस्त्यावर पसरत आहे. तसेच या कच-यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाण्यासाठी प्रवाशांकडून याच रस्त्याचा वापर केला जातो. त्यामुळे टर्मिनसकडे जाणा-या प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पालिकेने ही कचरा कुंडी दुसरीकडे हलवावी, अशी मागणी काही रहिवाशांकडून केली जात आहे. 

Loading Comments