Advertisement

विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका


विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका
SHARES

मालवणी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सेवादिनानिमित्त बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मालवणीतल्या गेट नंबर आठ परिसरात मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्राचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मालाड मार्वे रोड परिसरातल्या पाचशे अंध आणि अंपग व्यक्तींना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. प्रयास आणि अभिलाषा फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश सिंग तसेच मोठया संख्येने भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा