दादर - गुरुवारी मुंबईतील समुद्र किनारी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. या विसर्जनानंतर निर्माल्याचा वापर नागरीकांनी न केल्यामुळे समुद्र किनारी कचरा झाला. यामुळे समुद्रकिनारी महापालिका कर्मचा-यांना मदत व्हावी यासाठी मनसे हवाई सेना आणि जी.एन. खालसा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिम राबवली, आणि दादर समुद्र किनारा साफ केला.या वेळी मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी देखील कर्मचारी आणि सफाई करणा-या विद्यार्थ्यांना मदत केली.