मंडळ भारी आहे...

 Goregaon
मंडळ भारी आहे...

जोगेश्वरीच्या शामनगरचा राजा गणेश मंडळाने 51व्या वर्षी पदार्पण केले आहे. यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या सुरक्षा घोसाळकर यांनी शुभेच्छापूर्वक भावना व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. 1966मध्ये लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेने प्रोत्साहीत होवून 'जनतेचा राजा' या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान वर्गणी-देणगीची रक्कम गरजू विद्यार्थी आणि रुग्णांना मदत म्हणून दिली जाते. "गेल्या वर्षी 50व्या वर्षात 50 सामाजिक उपक्रम राबवत या मंडळाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकवला होता. तसेच 'मंडळ भारी आहे' या स्टार प्रवाह वाहिनीच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या अंतिम फेरीत ५व्या क्रमांकावर पोहचून जोगेश्वरीकरांचा मान वाढवला होता. इतरांनीही प्रेरणा घेवून लोकमान्य टिळकांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करावे", असे मनोगत घोसाळकर यांनी व्यक्त केले. 

Loading Comments