Advertisement

बाप्पा सापडले अंर्तकलहाच्या विळख्यात


SHARES

कुठलंही मंडळ म्हटलं की मतभेद, भांडणतंटे आलेच. चेंबूरमधील मिथुन एनक्लेव्ह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही आपापसातील मतभेदांचा फटका बसलाय. आणिक गाव परिसरात असलेल्या मिथुन एनक्लेव्ह सोसायटीच्या एच आणि आय विंगमधील रहिवाशांनी मंडळातील वाढत्या अंर्तकलहामुळे यावर्षी गणपती न आणण्याचा निर्णय घेतलाय. आपआपसातील वादांमुळे ही सोसायटी रजिस्ट्रारच्या ताब्यात गेलीय. येथील श्रीमती अंबर मेसन व दिलीप सोनावणे यांनी भास्कर शेट्टीयन, विशाल गंजू, सतीश आंबवडे यांच्या विरोधात तक्रारींचा सपाटा लावला आहे. त्यामुळे वैतागून रहिवाशांनी गणपती न बसवण्याचा निर्णय घेतलाय. या सर्व प्रकरणाची चौकशी आरसीएफ पोलिस ठाणे व परिमंडळ ६ करत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा