गटारांच्या उघड्या झाकणांमुळे अपघाताची शक्यता

 Sewri
गटारांच्या उघड्या झाकणांमुळे अपघाताची शक्यता

शिवडी - शिवडी पूर्व येथील बीपीटी कंटेनर रोडवर ठिकठिकाणी गटारांच्या उघड्या झाकणामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच भर म्हणजे या मार्गावर दिव्याचे खांबही बसवण्यात आलेले नाही. या गटारांची उंची साधारण 10 ते 12 फूट असल्याने एखादी व्यक्ती तोल जाऊन पडल्यास जीवघेणा अपघात घडू शकतो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे बीपीटी प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे वाहनचालक रुपेश ढेरंगे यांनी सांगितले.

 

Loading Comments