वांद्र्यात उघड्या गटारामुळे धोका

 Pali Hill
वांद्र्यात उघड्या गटारामुळे धोका
वांद्र्यात उघड्या गटारामुळे धोका
वांद्र्यात उघड्या गटारामुळे धोका
See all
Pali Hill, Mumbai  -  

वांद्रे - वांद्रे पूर्व परिसरातील मधुसुदन कालेलकर रस्त्याजवळून जाणा-या गटारावरील झाकणे उघडी असल्याने पादचा-यांना धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाकडून येथे झाकणे लावण्याचे काम अर्धवट झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. तसेच या परिसरात रस्त्यावर दिवे नसल्याने रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणा-या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. 

तसेच या गटाराच्या शेजारी गुरुनानक रुग्णालय असून, उघड्या नाल्यातून येणा-या डासांमुळे रुग्णांना त्रास होत आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता नाला बांधतानाच त्यावर झाकणे लावण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गटारावरील झाकणे गेली कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. 

Loading Comments