गृहिणीनेच रचला चोरीचा बनाव

 Kandivali
गृहिणीनेच रचला चोरीचा बनाव
गृहिणीनेच रचला चोरीचा बनाव
See all

कांदिवली चारकोप येथे तृतीयपंथीयांनी केलेल्या लुट प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळालीय. आर्थिक तंगीमुळे घरचे आपले स्त्रीधन विकतील, या भीतीपोटी फिर्यादी महिलेनंच चोरीचा बनाव रचल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. दोन तृतीयपंथीयांनी आपले दागिने लुटल्याची तक्रार 30 वर्षीय गृहिणीनं केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन तृतीयपंथीयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र तृतियपंथीयांचा तपास करतानाच पोलिसांनी उलट तपासालाही सुरुवात केली. उलट तपासामध्ये फिर्यादी महिलेचा बनाव उघड झाला. घरातील आर्थिक तंगीमुळे आपलं स्त्रीधन म्हणून मिळालेलं सोनं सासू आणि नवरा विकतील म्हणून या महिलेने हा बनाव रचला होता. पोलिसांच्या तपासणीत सात लाख रुपयांचे दागिने घरातच माळ्यावर एका डब्यात लपवल्याचे आढळून आले. तसेच तृतीयपंथीयांचा या चोरीशी कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले.  

Loading Comments