पोलिसांसोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'

 Borivali
पोलिसांसोबत साजरा केला 'व्हॅलेंटाईन डे'
Borivali, Mumbai  -  

बोरीवली - कायम आपलं कर्तव्य निभावत मुंबईकरांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांसोबत आनंदीबाई दामोदर काळे कॉलेजमधील एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला. प्रोग्राम ऑफिसर दीपिका जाजल यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोलिसांना गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसांना प्रेमाचा आणि आनंदाचा क्षण म्हणून आम्ही हा दिवस पोलिसांसोबत साजरा केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Loading Comments