रेल्वेतल्या भजनी मंडळांवर कारवाई

  Sewri
  रेल्वेतल्या भजनी मंडळांवर कारवाई
  मुंबई  -  

  रेल्वे डब्यात गर्दीच्या वेळी भजनी मंडळांच्या अरेरावीचा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय. याप्रकरणी हार्बर मार्गावरील वडाळा लोहमार्ग पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे भजनी मंडळींवर कारवाई करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी मोहीम हाती घेतली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी सहा तरूणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी रू 200 दंडाची शिक्षा सूनावली असून जामिनावर सोडले आहे. भजनी मंडळाच्या नावाखाली जागा अडवली जाते. अन्य प्रवाशांना बसू दिले जात नाही. या भजनी मंडळांचे स्वयंघोषित आरक्षण असल्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना अनेकदा उभ्यानंच प्रवास करावा लागतो.  

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.