'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन

Prabhadevi
'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन
'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन
'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन
'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन
'लॉरी बेकर'च्या 6 व्या आवृत्तीचे प्रकाशन
See all
मुंबई  -  

प्रभादेवी- जागतिक कीर्तीचे वास्तू शास्त्रज्ञ लॉरी बेकर यांच्यावर आधारित असलेल्या लॉरी बेकर या पुस्तकाच्या 6 व्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सोमवारी संध्याकाळी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे कला अकादमीत पार पडला. लॉरी बेकर या पुस्तकाचे लेखन ख्यातनाम लेखक अतुल देऊळगावकर यांनी केले आहे. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत दिग्दर्शक अदूर गोपाळकृष्णन आणि विख्यात चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी उपस्थिती नोंदवली होती. 

लॉरी बेकर यांची कला ही बोलण्याची गोष्ट नसून, पाहण्याची गोष्ट आहे. देशात चौकोनी घरे बांधणारे अनेक लोक आहेत. परंतु निसर्गाची काळजी घेऊन आपले काम करणारे कमीच आहेत. वाया गेलेल्या वस्तूंमधून घराची निर्मिती हे लॉरी बेकर यांच्या वास्तूकलेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. देऊळगावकर यांनी या वेळी पीपीटीच्या माध्यमातून लॉरी बेकर यांच्या वस्तूंची छायाचित्रे दाखवत माहिती दिल्याचे अतुल देऊळगावकर म्हणाले.

या कार्यक्रमाचे निवेदन मकरंद जोशी यांनी केले. 2017 हे बेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने बेकर यांच्या कलेवर आधारित असलेल्या या पुस्तकाच्या 6 व्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा हा एक उत्तम योगायोग आहे. परंतू लातूरच्या भूकंपानंतर बेकर यांनी पर्यावरण पूरक आणि कधीही भूकंपाच्या हादऱ्याने न पडणारी घरे कशी बांधता येतील याचा आराखडा तयार केला होता. परंतु या प्रकल्पातून बेकर यांना अत्यंत वाईटरित्या काढून टाकण्यात आले होते. बेकर यांनी बनवलेल्या उत्कृष्ट अशा वास्तूकेलेला महाराष्ट्र मुकला. याची सल आजही मनात असल्याची भावना मकरंद जोशी यांनी या वेळी व्यक्त केली.

एखाद्या वास्तू शास्त्रज्ञावर आधारित पुस्तकाची 6 वी सुधारित आवृत्ती निघावी, अशी ही देशातील कदाचित पहिलीच घटना असेल. बेकर भारतात येऊनही त्यांच्या कलेचा फायदा भारताला घेता आला नाही. बेकर हे गांधीजींच्या फार जवळ असलेले दिसतात. कलाकार अनेक आहेत परंतु आपल्या कलेचा समाजाला, पर्यावरणाला कसा फायदा होईल हे बघून आपली कला जोपासणारे कलाकार जगात क्वचितच असतात असं कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विख्यात चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.