Advertisement

कॉ. डांगेंसाठी सर्वपक्षीय दिग्गज एकाच व्यासपीठावर


कॉ. डांगेंसाठी सर्वपक्षीय दिग्गज एकाच व्यासपीठावर
SHARES

दादर - कम्युनिस्ट चळवळीचे संस्थापक नेते श्रीपाद डांगे यांच्या चरित्रावर आधारीत 'एस. ए. डांगे - एक इतिहास' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा दादरच्या योगी सभागृहात शनिवारी पार पडला. या चरित्रग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. या वेळी बोलताना उपस्थित असलेल्या सर्वच दिग्गजांनी डांगे यांच्या आठवणींना उजाळा दिला. रोझा देशपांडे आणि बानी देशपांडे यांनी या चरित्रग्रंथाचं लेखन केलंय.

या ग्रंथामुळे देशातील विशिष्ट कालावधीचे चित्र आपल्यासमोर उभे राहते. डांगे एक अभूतपूर्व व्यक्तीमत्व होते. डांगेंच्या कम्युनिझमच्या विचाराला राष्ट्रवादाची किनार होती. त्यामुळे कित्येक वेळा त्यांनी इंदिरा गांधी यांचे समर्थन केले होते -  

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस


1926 ला फैजपूरच्या अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य होण्यासाठी डांगे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे ते काँग्रेसचे प्रॉडक्ट होते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही - 

सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते

शिवसेनेच्या अधिवेशनाच्या वेळी डांगेंना बोलावले होते. आज तशी परिस्थिती राहिली नाही. जुन्या पिढीकडे जुने टिळक-सावरकर असे नेते होते. त्यांच्याकडून ते शिकले. आजच्या पिढीमध्ये कोणाकडे पहावे हे कळत नाही आणि असले तरी त्यांच्याकडे पाहून शिकावे का? हा प्रश्न निर्माण होतो - 

उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख

1991 ला मुंबई विद्यापीठ कॉ. श्रीपाद डांगे यांना डी. लिट पदवी देणार होते. त्यावेळी अभाविपच्या माध्यमातून आम्ही त्याला विरोध केला होता. त्याचे प्रायश्चित्त म्हणून मरणोत्तर डी. लिट डांगे यांना दिलंच पाहीजे, असे पत्र मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, विद्यापीठाचे कुलगुरू यांना दिले आहे - 

आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा