भायखळ्यात भव्य चित्रकला स्पर्धा

 Mazagaon
भायखळ्यात भव्य चित्रकला स्पर्धा
भायखळ्यात भव्य चित्रकला स्पर्धा
भायखळ्यात भव्य चित्रकला स्पर्धा
See all

भायखळा - चिमुकल्यांसाठी भायखळातल्या झुला मैदान येथे शनिवारी भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. युवा काँग्रेस आणि हेल्पिंग हँड संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत दीड हजार छोट्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा अ, ब आणि क अशा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. अ मध्ये तीन ते पाच वयोगटातील मुलांचा समावेश होता. तर ब गटात सहा ते नऊ वयोगटातील मुलांचा समावेश होता आणि क गटात दहा ते बारा वयोगटातील मुलांचा समावेश होता. या वेळी सर्वच स्पर्धकांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्रक देण्यात आली.

या स्पर्धेच्या दरम्यान संस्थेचे अध्यक्ष अशफाक सिद्धीकी, काँग्रेसचे भायखळा विधानसभाचे माजी आमदार मधू चव्हाण आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्तिथ होते.

Loading Comments