बाल चित्रकारांचा सत्कार

 Maharashtra Nagar
बाल चित्रकारांचा सत्कार
बाल चित्रकारांचा सत्कार
बाल चित्रकारांचा सत्कार
बाल चित्रकारांचा सत्कार
See all

महाराष्ट्र नगर - भांडुप (प.), बीपीईएस हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांची नैसर्गिक उर्जा (ग्रीन एनर्जी) या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहाभाग नोंदवला. यातील विजेत्या स्पर्धकांचा शुक्रवारी सायंकाळी शाळेतील कार्यक्रमात ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचे व्यवस्थापकीय मंडळावरील पदाधिकरी आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालकवर्ग उपस्थित होते.

Loading Comments