नेहरू सेंटरमध्ये कलाप्रेमींसाठी विनामूल्य चित्र प्रदर्शन

Nehru Centre

See all
मुंबई  -  

वरळी - चित्रकार उपासना त्रिपाठी यांच्या चित्रांचे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरवण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनात 7 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंतच्या चित्रांचा समावेश आहे.

लखनऊला एमए एफएची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ चित्रकला जोपासण्याचा निर्णय घेतला. उपासना यांचे अनेक ठिकाणी सोलो शो देखील झाले आहेत. या चित्रप्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी भरवण्यात आलेल्या प्रत्येक प्रदर्शनात उपासना यांची चित्रे विकली गेली.

सध्या उपासना यांच्या नेहरू सेंटर येथील चित्रप्रदर्शनात चित्रातील मानव आकृत्यांमध्ये चेहरे न दाखवता कलात्मकरित्या व्यक्तींचे भाव आणि संवाद दाखवण्यात आले आहेत. उपासना त्रिपाठी यांचे हे चित्रप्रदर्शन विनामूल्य असून 27 मार्च पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत कलाप्रेमींसाठी खुले राहणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.