कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी

Kurla
कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी
कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी
कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी
कुर्ल्यात साकारली 15 हजार चौरस फुटांची रांगोळी
See all
मुंबई  -  

कुर्ला - गुढीपाडवा निमित्त कुर्ल्याच्या न्यू मिल मैदान येथे तब्बल पंधरा हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. कुर्ल्यातील हिंदू नव वर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे गेली 9 वर्ष गुढीपाडवा निमित्त विविध सामाजिक संदेश देणारे उपक्रम येथे आयोजित केले जातात.

यंदाच्या वर्षी या भव्य रांगोळीतून हुत्मात्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. या भव्य रांगोळीच्या मध्यावर अमर जवान स्मारक तसंच जवानांचे चित्र आणि शूरा मी वंदिले हा संदेश देण्यात आला आहे. रंगधेनु कला समूहाच्या एकूण अठ्ठावीस कलाकारांनी सात तास पंचेचाळीस मिनिटांत ही भव्य रांगोळी साकारली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.