Advertisement

कला, संगीत, संस्कृतीचा मिलाफ अर्थात 'काळा घोडा फेस्टिव्हल'


कला, संगीत, संस्कृतीचा मिलाफ अर्थात 'काळा घोडा फेस्टिव्हल'
SHARES

फेब्रुवारी महिना सुरू होताच कलाप्रेमींना चाहूल लागते ती 'काळा घोडा महोत्सवा'ची. खाद्य, संगीत, संस्कृती आणि कलेचा मिलाफ असलेल्या 'काळा घोडा महोत्सवा'त मुंबईकरांना सर्व कलाकृतींचा आस्वाद घेता येतो. सर्व कलांनी परिपूर्ण असा हा 'काळा घोडा महोत्सवा'ला फोर्ट इथं ३ फेब्रुवारी म्हणजेच शनिवारपासून सुरूवात होणार आहे. सलग ९ दिवस चालणारा हा महोत्सव गेल्या १६ वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाला भेट देणाऱ्या कलाप्रेमींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे



यावर्षी कोणती थीम?

दरवर्षी बदलणाऱ्या परिस्थितीनुसार, घडणाऱ्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकत कलेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना या महोत्सवातून वाचा फोडली जाते. यंदाही अनेक विषय वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यावर्षी 'हरा घोडा' ही महोत्सवाचा थीम आहे. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.



महोत्सवाची खासियत

हस्तकला, खाद्यपदार्थ, सजावटीचं साहित्य, टाकाऊपासून कलात्मक वस्तू, कलात्मक प्रदर्शन, नैसर्गिक सुंदरता आणि तंत्रज्ञान यासंबंधित अनेक कलात्मक रचनांची या महोत्सवाच रेलचेल असते. या महोत्सवाअंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये पारंपरिक लोकनृत्य, पपेट शो अर्थात कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम यासारखे अनेक कार्यक्रम काळा घोडाला भेट देणाऱ्यांचे मनोरंजन करतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनोरंजनाची साधनं या महोत्सवात आहेत. लहान मुलांसाठी विशेष कार्यशाळांचं आयोजन इथं करण्यात येतं. याशिवाय साड्या, धातूशिल्प, भित्तिचित्र, नक्षीकाम असलेले कापड, हातमागाच्या वस्तू, दागिने यांसारख्या वस्तूंचे स्टॉल महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात.   


३ फेब्रुवारीला सुरू होणारा हा महोत्सव ११ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. या विकेंडला तुमचा काही प्लॅन नसेल, तर 'काळा घोडा महोत्सवा'ला नक्की भेट द्या.  


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा