तीन दिवस मुंबईत रंगणार 'लोकरंग महोत्सव'


  • तीन दिवस मुंबईत रंगणार 'लोकरंग महोत्सव'
  • तीन दिवस मुंबईत रंगणार 'लोकरंग महोत्सव'
SHARE

महाराष्ट्राच्या लोकसंगीताचं, लोकसंस्कृतीचं जतन व्हावं, यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'महाराष्ट्र सांस्कृतिक अभियान न्यास' यांच्यावतीने लोकरंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. संस्थेच्यावतीने 'लोकरंग महोत्सव २०१८-प्रवास परंपरेचा' या कार्यक्रमाचे आयोजन २३,२४,२५ मे ला दामोदार हॉल परळ येथे सायंकाळी ७ ते ११ या वेळेत करण्यात आलं आहे.१२५ कलावंतांचा असणार सहभाग

भारताला लोककलेचा मोठा वारसा लाभला आहे. लोकसंस्कृतीची अपूर्व देगणी निसर्गाने बहाल केली आहे. याचे दर्शन मुंबईकरांना या महोत्सवाद्वारे घेता येणार आहे. याच उद्देशाने 'लोकरंग महोत्सव २०१८'चे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १२५ कलावंतांचा सहभाग या महोत्सवात असणार आहे. हा महोत्सव प्रेक्षकांसाठी विनामूल्य असणार आहे. ३ दिवसांत सुमारे २७०० रसिक या महोत्सवाचा लाभ घेऊ शकतील.अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचं होणार सादरीकरण

अरूण पेदे वेसावरकर यांचा 'दर्याचा राजा', सृष्टी कलामंच यांचा 'संस्कृती-कलात्मक भारताची' आणि शाहिरी लोककला मंच यांचा 'शाहिरी लोकरंग' अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा सादरीकरणही यावेळी करण्यात येणार आहे.

'मुंबई लाइव्ह' या महोत्सवाचे मीडिया पार्टनर आहेत. दरवर्षी उद्योग, क्रीडा, राजकीय, चित्रपट-मालिका क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती या महोत्सवाला हजेरी लावतात. शिवसेना खासदार अरविंद सावंत या महोत्सवाचे अध्यक्ष असणार आहेत.हेही वाचा

दादा कोंडके स्मृती पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न


संबंधित विषय
ताज्या बातम्या