Advertisement

कलाकारांद्वारे मेट्रो स्टेशन सुशोभित होणार, मुंबई मेट्रोचा 'रंग दे मेट्रो' उत्सव

१७ ऑगस्ट ते १७ डिसेंबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने हा उत्सव सुरू राहणार आहे. उपक्रमांत सहभागी झालेल्या तरुणांची त्यांनी काढलेल्या चित्रांच्या आधारे निवड करण्यात येईल.

कलाकारांद्वारे मेट्रो स्टेशन सुशोभित होणार, मुंबई मेट्रोचा 'रंग दे मेट्रो' उत्सव
SHARES

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वन ने 'रंग दे मेट्रो' या नवीन थीमसह 'माझी मेट्रो फेस्टिवल 2021' ची घोषणा केली आहे. यामध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील कलाकारांद्वारे मेट्रो स्टेशन सुशोभित केलं जाणार आहे. 

'रंग दे मेट्रो' या उपक्रमांतर्गत तरुणांना आपल्या स्वप्नातल्या मेट्रो स्थानकांतील रंग प्रत्यक्षातील मेट्रो स्थानकांना देता येणार आहे. मंगळवारपासून या उत्सवासाठी नावनोंदणी सुरू होणार आहे. १७ ऑगस्ट ते १७ डिसेंबर यादरम्यान टप्प्याटप्प्याने हा उत्सव सुरू राहणार आहे. उपक्रमांत सहभागी झालेल्या तरुणांची त्यांनी काढलेल्या चित्रांच्या आधारे निवड करण्यात येईल.

निवड झालेल्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. त्यानंतर स्वसंकल्पनेवर आधारित चित्र काढण्याची संधी दिली जाईल. या उपक्रमात परीक्षकांच्या पथकांकडून अंतिम पाहणी होईल. यातील सर्वोत्तम चित्र कलाकृती मेट्रो स्थानकावरील खांबावर रेखाटली जाईल. या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी रिलायन्स मुंबई मेट्रोच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन मेट्रो वनने केलं आहे.

ललित कला अकादमीचे कार्यकारी मंडळ सदस्य किशोर कुमार दास आणि सर जे.जे. कला महाविद्यालयातील मारुती शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालय आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या मदतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा