म्युझियम ऑन व्हिल

 vile parle
म्युझियम ऑन व्हिल
म्युझियम ऑन व्हिल
म्युझियम ऑन व्हिल
म्युझियम ऑन व्हिल
म्युझियम ऑन व्हिल
See all
  • भानू प्रताप सिंह
  • कला

विलेपार्ले - शिवाजी वस्तू संग्रहालयातर्फे ‘म्युझियम बस’ ही सेवा गेल्या वर्षीपासून सुरू केली आहे. आज ही बस विलेपार्लेतल्या साठ्ये कॉलेजात आली होती. यानिमित्ताने पार्लेकरांना ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. साठ्ये कॉलेजच्या इतिहास विभागाच्या पुढाकाराने ऐतिहासिक वस्तींचे प्रदर्शन भरवण्यात आले.

छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयातील वस्तूंचा ठेवा प्रत्यक्ष जाऊन पहाणे शक्य नसते. त्यामुळेच म्युझियम बसची योजना गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आली. सिटी इंडियाची आर्थिक मदत घेऊन ही योजना सुरू केली गेली. या योजनेअंतर्गत गुरुवारी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ही बस साठ्ये कॉलेजमध्ये होती. यावेळी पारंपरिक भारतीय खेळांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

Loading Comments