टर्मिनल 2 वरील 'जय हे' कलादालनाचे उद्घाटन

 Andheri
टर्मिनल 2 वरील 'जय हे' कलादालनाचे उद्घाटन
Andheri, Mumbai  -  

'जागतिक संग्रहालय दिना'च्या निमिताने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 'जय हे' या कलादालनाचे उद्घाटन गुरूवारी राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि जेव्हीके कंपनीच्या माध्यमातून हे भले मोठे कलादालन कला रसिकांसाठी खुले करण्यात आले आहे. टर्मिनल 2 वर उभारण्यात आलेल्या या कलादालनात भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असून ही कलाप्रेमी, प्रवासी आणि पर्यटकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे.

भारतातील नामवंत कलावंतांनी या कलादालनात आपली कला सादर केली असून विमानतळाच्या मोठ्या भिंतीवर साकारलेल्या कलेचा आनंद भारतीय तसेच परदेशी प्रवासी घेऊ शकतील. उद्घाटनाच्या निमित्ताने कच्छ येथून आलेल्या कलाकारांनी पारंपरिक कला सादर करून संपूर्ण विमानतळ परिसर संगीतमय केला होता.

Loading Comments