नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन

 Worli
नेहरू सेंटरमध्ये चित्रप्रदर्शन

वरळी - चित्रकार प्रिया प्रमोद पाटील यांनी सांकेतिक चिन्हांच्या चित्रमालेचे मोफत चित्रप्रदर्शन नेहरू सेंटर आर्ट गॅलरीमध्ये भरवले आहे. 20 मार्चपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत चित्ररसिकांसाठी हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले आहे.

प्रिया पाटील यांनी बोधी तत्त्वावर आधारित चिन्ह, चिन्हरूपी संदर्भ यांचा समावेश आपल्या चित्रांमध्ये घेतला आहे. प्रयोगशील जीवनाचा प्रवास या चित्रमालेतून दाखवण्याचा प्रयत्न प्रिया पाटील यांनी केला आहे. एक वेगळा प्रयोग आणि मांडणी हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे.

Loading Comments