Advertisement

काव्यवाचन स्पर्धेतून सामाजिक विषयांचा जागर


काव्यवाचन स्पर्धेतून सामाजिक विषयांचा जागर
SHARES

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेतल्या स्पर्धकांनी पर्यावरण, स्त्री अत्याचार, भ्रष्टाचार, प्रेम, बंधन, सामाजिक सुरक्षा, नोट बंदी हे सर्व विषय एका कवितेच्या माध्यमातून मांडले. यामध्ये कामगार कुटुंबियांनी देखील सहभाग घेऊन विविध कविता सादर केल्या. स्पर्धेच्या नियमानुसार तीन उत्कृष्ठ कवींची तर दोन उत्तेजनार्थ कवींची निवड करण्यात आली. त्यांना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह आणि रोख रक्कम देऊन सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांच्या हस्ते गौरवण्यात आले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगाव आणि मुंबईच्या श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी नायगाव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण ललित कलाभवनच्या सभागृहात ही स्पर्धा रंगली.

या कवितांचे परीक्षण करण्यासाठी प्रसिद्ध कवी महेंद्र कुरघोडे आणि नंदकुमार आवळे यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक संजय मोहिते, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान अध्यक्ष दत्ता मोरे, उपाध्यक्ष राज जैतपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा