द डिव्हाइन दर्शन

 BDD Chawl
द डिव्हाइन दर्शन
द डिव्हाइन दर्शन
द डिव्हाइन दर्शन
See all

वरळी - प्रसिद्ध चित्रकार प्रमोद पेंडसे यांचे ‘द डिव्हाईन दर्शन’ हे चित्र प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटर मध्ये लावण्यात आलय. 25 ते 31 ऑक्टोबर या काळात ते कलाप्रेमींसाठी खुलं असणर आहे. या मध्ये नटराज, अन्नपूर्णा देवी, गायत्री देवी, महालक्ष्मी देवी, सरस्वती देवी, शुभ्रतारा देवी, श्रीनाथजी रामचंद्र अशा देवदेवतांची चित्रे लावण्यात आलीयेत. या मध्ये 33 चित्रांचा समावेश आहे. या चित्रांच्या किंमती 50 हजार ते 2 लाखांपर्यंत आहे. चित्रकार पेंडसे हे पेशाने व्यवसायिक आहेत. पेंडसे यांच्या चित्रांचे हे दुसरे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनापूर्वी पेंडसे यांनी 2014 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन लावले होते. पेंडसेंच्या चित्रांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पेंटिंग बरोबरच त्या चित्राची पूर्ण माहिती त्यांनी संस्कृत भाषेत कॅलिग्राफी स्टाइल मध्ये लिहीलीये.

Loading Comments