Advertisement

लेखिका, कवियित्री कविता महाजन यांचं निधन

न्यूमोनिया झाल्याने त्यांना बावधन येथील चेलाराम रुग्णालयात दाखल केलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं.

लेखिका, कवियित्री कविता महाजन यांचं निधन
SHARES

प्रसिद्ध लेखिका आणि कवियित्री कविता महाजन यांचं गुरूवारी पुण्यात निधन झालं.  न्यूमोनिया झाल्याने त्या चेलाराम रुग्णालयात उपचार घेत होत्या. उपचारादरम्यान त्यांची गुरूवारी संध्याकाळी प्राणज्योत मालवली. त्या ५१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगी व वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

साहित्य अकादमीचा पुरस्कार 

न्यूमोनिया झाल्याने त्यांना बावधन येथील चेलाराम रुग्णालयात दाखल केलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. उपचारादरम्यान गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.  रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादासाठी त्यांना २०११ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता. ब्र, भिन्न आणि कुहू या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध अाहेत.


अादिवासींसाठी काम

कविता महाजन यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६७ रोजी नांदेड येथे झाला. नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण झालं. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती. काही दिवसांपूर्वीच त्या वसई येथून पुण्यात राहण्यास आल्या होत्या. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात त्यांनी काम केलं. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. 






संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा