Advertisement

'१०२ नॉट आऊटचा' नॉट आऊट ट्रेलर!

२७ वर्षांनंतर अमिताभ आणि ऋषी कपूर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' अशी हटके टॅगलाईन या चित्रपटाला आहे. या चित्रपटातून वडील आणि मुलाचं वेगळं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे.

'१०२ नॉट आऊटचा' नॉट आऊट ट्रेलर!
SHARES

बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा '१०२ नॉट आऊट' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. २७ वर्षांनंतर अमिताभ आणि ऋषी कपूर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' अशी हटके टॅगलाईन या चित्रपटाला आहे. या चित्रपटातून वडील आणि मुलाचं वेगळं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे.



अमिताभ बच्चन वडिलांची तर ऋषी कपूर ७५ वर्षांच्या मुलाची भुमिका साकारत आहेत. वय वाढत असताना दिलखुलास जगण्यावर काहीच फरक पडत नसलेल्या अफलातून जगणाऱ्या वडिलांची अशी ही भूमिका आहे. या भूमिकेला अमिताभ यांनी न्याय दिला आहे. ट्रेलर पाहाता अमिताभ आणि ऋषी कपूर या जोडीची धम्माल बघायला मिळणार हे नक्की.

त्याचप्रमाणे आपल्या वडिलांच्या विक्षिप्त वागण्याचा त्रास होत असताना देखील चेहऱ्यावर न दाखवणाऱ्या मुलाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित हा चित्रपट ४ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

अंड्यातले ऋषी कपूर आणि शंभरीपार अमिताभ बच्चन!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा