Advertisement

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी माध्यमांना निवेदन दिलं आहे. जाणून घ्या काय प्रतिक्रिया आहे त्यांच्या कुटुंबियांची...

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी दिली 'ही' प्रतिक्रिया
SHARES

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषी कपूर यांचं आज निधन झालं आहे. या वृत्ताला त्यांच्या कुटुंबियांनी दुजोरा दिला आहे. कुटुंबियांकडून माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, आमचा प्रिय ऋषी कपूर हा ल्युकेमिया आजारानं ग्रस्त होता. २ वर्षांच्या लढाईनंतर आज सकाळी ८.४५ वाजता रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनुसार ते शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी होते.

तो एक शूर माणूस होता, त्यानं एक मोठी लढाई लढली आहे. गेली दोन वर्षे त्यांच्यावर उपचार चालले. या दरम्यान तो आनंदी होता. या दोन वर्षात त्यांनी आपल्या कुटुंबावर, मित्र, जेवण आणि चित्रपट या सर्वांवर अधिक लक्ष दिले. त्यानं ज्याप्रकारे आजारावर मात केली होती हे पाहून त्याला भेटायला येणारे आश्चर्य व्यक्त करायचे.

जगभरातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल तो कृतज्ञ होता. त्याच्या निधनानंतर, सर्वांनी एक समजलं पाहिजे की, त्याला अश्रूंनी नाही तर हास्यामध्ये लक्षात ठेवा. त्यालाही हेच आवडेल.

वैयक्तिक हानीच्या याक्षणी, हे विसरून नाही चालणार की जग अत्यंत कठीण काळातून जात आहे. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर अनेक निर्बंध आहेत. आम्ही त्याच्या सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना आणि कौटुंबिक मित्रांना लागू असलेल्या कायद्याचा आदर करण्याची विनंती करू इच्छितो.



हेही वाचा

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा