Advertisement

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते.

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन
SHARES

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली.

बुधवारी रात्री त्यांची प्रकती बिघडली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी रुग्णालयात ऋषी कपूर यांच्यासोबत पत्नी नितू होत्या.

बुधवारी ऋषी कपूर यांची प्रकृती खालावल्यानं आणि अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बुधवारी त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती. ते म्हणाले होते की, ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे आम्ही बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांची तब्येत बिघडली असली तरी तो निश्चितच बरा होईल.

कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर त्यांनी उपचार घेतला. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा