Advertisement

आमिर गाजवणार पुढल्या वर्षीचा ख्रिसमस!

वायाकॉम १८ मोशन पिक्चर्सच्या सहयोगानं निर्माण करण्यात येणाऱ्या या चित्रपटात आमिर आजवर कधीच न पाहिलेल्या रूपात दिसेल असं सांगण्यात येत आहे. आजवरच्या आपल्या फिल्मी करियरमध्ये आमिरनं कधी रोमँटिक, तर कधी ग्रेशेडेड... कधी पोलिस अधिकारी, तर कधी व्यावसायिक अशा नाना प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

आमिर गाजवणार पुढल्या वर्षीचा ख्रिसमस!
SHARES

सध्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात श्रमदानाच्या माध्यमातून पाणी जिरवण्यासाठी कार्य करणारा आमिर खान पुढल्या वर्षीचा ख्रिसमस गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.


स्पेशल करण्यासाठी सरसावला

आमिर सध्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्यासाठी काम करत आहे. महाराष्ट्र दिनी त्यानं मराठी कलाकारांच्या साथीनं श्रमदान करत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. एकीकडे समाजकार्यात मग्र असलेला आमिर आपल्या करियरमध्येही बरंच काहीतरी नवीन करत आहे. गत वर्षी प्रदर्शित झालेल्या 'ठग्ज आॅफ हिंदोस्तान' या चित्रपटानं दगा दिल्यानंतर आमिर काहीतरी स्पेशल करण्यासाठी सरसावला आहे. याची चाहूल सर्वांना त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लागली आहेच.


लाल सिंह चढ्ढा'

आमिरनं वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं शीर्षक आहे 'लाल सिंह चढ्ढा'. हा आमिरच्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्सपैकी एक आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजे २०२० मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर 'लाल सिंह चढ्ढा' प्रदर्शित करण्याची योजना आमिरनं आखली आहे. अभिनेता अतुल कुलकर्णीनं या चित्रपटाचं लेखन केलं आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' फेम अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती'च्या वेळी आमिरला या चित्रपटाची संकल्पना सुचली होती आणि ती त्यानं अतुलला बोलून दाखवली होती असं समजतं.


पगडीधारी आमिर

वायाकॉम १८ मोशन पिक्चर्सच्या सहयोगानं निर्माण करण्यात येणाऱ्या या चित्रपटात आमिर आजवर कधीच न पाहिलेल्या रूपात दिसेल असं सांगण्यात येत आहे. आजवरच्या आपल्या फिल्मी करियरमध्ये आमिरनं कधी रोमँटिक, तर कधी ग्रेशेडेड... कधी पोलिस अधिकारी, तर कधी व्यावसायिक अशा नाना प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, पण 'लाल सिंह चढ्ढा'मधील त्याची भूमिका या सर्वांपेक्षा खूप वेगळी असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. या चित्रपटातील काही दृश्यांमध्ये पगडीधारी आमिरही पाहायला मिळणार असल्याचं संकेत यापूर्वीच मिळाले आहेत. या चित्रपटातील इतर कलाकारांची घोषणा अद्याप व्हायची आहे.हेही वाचा -

नागरिकत्वावर अखेर अक्षयनं तोडली चुप्पी

२ महिन्यांनी भारतात परतेन- ऋषी कपूर
संबंधित विषय
Advertisement