Advertisement

अभिषेक बच्चन, राजकुमार राव स्टारर 'लुडो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

गेल्या काही महिन्यांपासून लुडो चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं आहे.

अभिषेक बच्चन, राजकुमार राव स्टारर 'लुडो' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून लुडो चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केलं आहे. आज या चित्रपटाचा मनोरंजन ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच चित्रपटाची कथा आहे. चित्रपटात चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. राजकुमार राव एका मजनूची भूमिका साकारत आहेत. ज्याची मैत्रीण फातिमा सना शेख आहे. आता हा मजनू त्याच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मदत करत असतो.

त्याचवेळी अभिषेक बच्चन एका अपहरणकर्त्याची भूमिका साकारत आहे. ज्यानं नुकत्याच या व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. सान्या मल्होत्रा आदित्य रॉय कपूरच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे. या दोघांमध्ये प्रेम आहे. त्याच वेळी, पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा अक्शन अवतारात पाहायला मिळत आहे.

या चित्रपटासंदर्भात अनुराग बासू म्हणाले होते की, लुडो ही एक अतिशय रंजक कथा आहे. या चित्रपटाची कथा३ ते ४ वर्षांपूर्वी माझ्या मनात आली. ही एक मजेशीर राईड आहे. लुडोप्रमाणे याच्या चार बाजू आहेत.

अनुराग बासू दिग्दर्शित लूडो या चित्रपटात अभिषेक बच्चन, आदित्य रॉय कपूर, सान्या मल्होत्रा, राजकुमार राव, फातिमा सना शेख आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा

कंगनाविरोधात एफआयआर दाखल करा; मुंबई पोलिसांना कोर्टाचे आदेश

प्रसार भारतीचा मोठा निर्णय, PTI, UNI चं सबस्क्रिप्शन रद्द

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement