Advertisement

अभिषेक बच्चनची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नानावटी रुग्णालयात दाखल असलेला अभिषेक बच्चन कोरोनामुक्त झाला आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अभिषेक बच्चनची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
SHARES

नानावटी रुग्णालयात दाखल असलेला अभिषेक बच्चन कोरोनामुक्त झाला आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अभिषेक बच्चनने ट्विट करत ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये अभिषेकने म्हटलं की, प्रॉमिस हे प्रॉमिस असते. आज दुपारी माझी कोविड १९ टेस्ट निगेटिव्ह आली. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की, मी याला हरवेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना केली याचे खूप आभार. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप धन्यवाद.

अभिषेक २८ दिवसांपासून नानावटी रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये कोविड १९ वर उपचार घेत होता. ११ जुलैच्या संध्याकाळी तो आणि अमिताभ बच्चन हे लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयात गेले होते. अभिषेकने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी ट्विटरवर दिली होती. 

अभिषेक बच्चनने शनिवारी हॉस्पिटलमधून आपल्या केअर बोर्डचा फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिलं आहे की, मी तुम्हाला म्हणालो होतो. डिस्चार्ज प्लान- हो. आज दुपारी माझा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला. प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. मला घरी जाण्याचा खूप आनंद आहे. नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप आभार त्यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची खूप काळजी घेतली आणि आम्हाला कोविडवर मात करण्यास मदत केली. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हते.



हेही वाचा - 

मृत्यूदर शून्यावर आणणं हेच लक्ष्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

 मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा