Advertisement

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन


प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
SHARES

प्रसिद्ध अभिनेते  सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 

सतीश कौशिक हे गुडगाव येथील एका फार्महाऊसवर एका मिटिंगसाठी गेले होते. फार्म हाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावच्या फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले होते. 

'मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य आहे!' हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असे लिहावे लागेल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती' असं ट्वीट करत अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.

सतीश कौशिक हे अभिनेता, कॉमेडियन, स्क्रिप्ट रायटर, दिग्दर्शक आणि निर्माता होते. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया चित्रपटामुळे त्यांनी विशेष ओळख मिळाली. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा