Advertisement

गोविंदा साकारणार विजय माल्ल्याची भूमिका!


गोविंदा साकारणार विजय माल्ल्याची भूमिका!
SHARES

अभिनेते गोविंदा सध्या काय करत आहेत? याविषयी जर कुणाला विचारलं, तर त्याचं कुणालाही उत्तर देता येईल याची शक्यता कमीच आहे. कारण २००७ साली सलमान खानसोबत आलेल्या 'पार्टनर' या सिनेमानंतर गोविंदा बॉलिवुडच्या चर्चांमधून जणूकाही गायबच झाले आहेत. आता मात्र त्यांच्या नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आणि ती आहे दिग्दर्शक पहलाज निहलानी यांच्या आगामी चित्रपटाच्या बाबत!



विजय माल्ल्याच्या आयुष्यावर चित्रपट

पहलाज निहलानी सध्या 'रंगीला राजा' या त्यांच्या आगामी चित्रपटावर काम करत आहेत. यामध्ये अभिनेते गोविंदा महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट भारतात कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेला किंगफिशरचा मालक विजय माल्ल्यावर बेतलेला आहे. आणि विजय माल्ल्याची भूमिका गोविंदा साकारत आहेत.



किंगफिशर कॅलेंडरच्या ग्लॅमरचा तडका!

किंगफिशर कॅलेंडर हा सिनेमाचा मुख्य विषय असल्याचं सांगितलं जात आहे. सिनेमाचं काम सध्या जोरात सुरू आहे. गेल्याच आठवड्यात निहलानी यांनी गोविंदासोबत या सिनेमातलं एक गाणंही शूट केल्याचं बोललं जात आहे.



पहलाज निहलानींचं सूचक वक्तव्य

याबाबत पहलाज निहलानी यांना एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारलं असता 'गोविंदाच्या भूमिकेविषयी सध्या सुरू असलेली चर्चा मी स्विकारतही नाही आणि नाकारतही नाही', अशा प्रकारचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे विजय माल्ल्याच्या भूमिकेत गोविंदा दिसतील यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.


गोविंदा 'कमबॅक'च्या तयारीत

गेल्या अनेक वर्षांपासून गोविंदा बॉलिवुडमध्ये नवा धमाका करण्यात अपयशी ठरले आहेत. २०१७मध्ये आलेला त्यांचा 'आ गया हिरो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीही न करता निघून गेला. त्यामुळे एका मोठ्या धमाक्याची वाट सध्या गोविंदा पहात आहेत. 'रंगीला राजा'मधून गोविंदा जबरदस्त कमबॅक करतील अशी आशा त्यांच्या चाहत्यांना आहे.



हेही वाचा

इरफान खानचा ‘कारवां’ सुरू, 2 महिन्यांनंतर केलं इमोशनल ट्वीट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा