Advertisement

पत्नीचा फोन टॅप, नवाज मीडियावर भडकला!

नवाझुद्दीन याचा आपल्या पत्नीवर विश्वास नसल्याने ती कोणाशी बोलते, कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी त्याने हे रेकॉडर्स मागवले असल्याची चर्चा आहे. पण नवाझला कोणतेही समन्स आले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने ट्वीटरवर एक पोस्ट लिहून हे स्पष्ट केले आहे.

पत्नीचा फोन टॅप, नवाज मीडियावर भडकला!
SHARES

गॅँग्स ऑफ वासेपुर, पान सिंग तोमर, तलाश, रईस, बजरंगी भाईजान अशी एक से बढकर एक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नवाजुद्दीन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.


नवाजुद्दीन सिद्दीकीचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी नवाजुद्दीनच्या पत्नीचे सीडीआर काढले होते. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या तपासात हे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पत्नीच्या कॉल रेकॉर्ड आणि ठावठिकाण्यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजने सीडीआर म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स मागवले होते.


 

नवाजुद्दीनचा आपल्या पत्नीवर विश्वास नसल्याने ती कोणाशी बोलते, कुठे जाते हे जाणून घेण्यासाठी त्याने हे रेकॉर्ड्स मागवल्याची चर्चा आहे. पण नवाजला कोणतेही समन्स आले नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने ट्वीटरवर एक पोस्ट लिहून हे स्पष्ट केले आहे. 'मी माझ्या मुलीला तिचे शाळेतील प्रोजेक्ट्स करायला मदत करत होतो. आणि त्यानंतर तिच्याबरोबर शाळेत गेलो. कालपासून मीडिया माझ्यावर चुकीचे आरोप लावत आहे', अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

नवाजने 'ब्लॅक फ्रायडे' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले. लवकरच नवाज बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर येणाऱ्या चित्रपटात बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यंतरी त्याच्या आत्मचरित्रावरूनही चांगलाच वाद रंगला होता.



हेही वाचा

असा दिसतोय नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या लूकमध्ये!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा