... तर नवाजुद्दीन बनला असता फोटोग्राफर

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात काही सेकंदांचा रोल मिळवण्यासाठी नवाजुद्दीन अक्षरश: धडपडत असायचा. एखाद्या छोट्याशा रोलसाठी कित्येकदा ऑडिशन्स द्यायचा. यात बऱ्याचदा त्याला रिजेक्शनचाही सामना करावा लागायचा.

  • ... तर नवाजुद्दीन बनला असता फोटोग्राफर
SHARE

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आज ज्या ठिकाणी आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड कष्ट केल्याचं सर्वांच्याच ऐकिवात आहे. स्ट्रगलशी खूप जुनं नातं असलेल्या नवाजचा 'फोटोग्राफ' हा नवीन सिनेमा प्रदर्शित होत आहे. नवाजुद्दीनचं फोटोग्राफीशीही एक अनोखं नातं आहे. ते या सिनेमाच्या निमित्तानं पुन्हा प्रकाशात आलं आहे. 


फोटोग्राफरच्या भूमिकेत

दिग्दर्शक रितेश बत्रांच्या 'फोटोग्राफ' या आगामी सिनेमात नवाजुद्दीन फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसणार असल्याचं एव्हाना सर्वांनाच ठाऊक झालं आहे. या सिनेमाचे पोस्टर्स, प्रोमोज आणि ट्रेलर्स आज सर्वत्र झळकत आहेत. या सिनेमात नवाजसोबत 'दबंग गर्ल' सान्या मल्होत्रा दिसणार आहे. या अनोख्या जोडीचं कुतूहल सर्वांनाच आहे, पण या सिनेमाच्या व्यक्तिरीक्त असलेली नवाजुद्दीन आणि फोटोग्राफी यांच्या अनोख्या नात्याची कहाणी फार कमी जणांना ठाऊक आहे.


माशी शिंकली

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात काही सेकंदांचा रोल मिळवण्यासाठी नवाजुद्दीन अक्षरश: धडपडत असायचा. एखाद्या छोट्याशा रोलसाठी कित्येकदा ऑडिशन्स द्यायचा. यात बऱ्याचदा त्याला रिजेक्शनचाही सामना करावा लागायचा. एकदा नवाजनं पहिल्यांदाच ऑडिशनसाठी फोटो काढले आणि बऱ्याच ठिकाणी पाठवले. ते फोटो पाहून नवाजला एका फोटोग्राफरच्या भूमिकेसाठी बोलावण्यात आलं होतं, पण तिथेही माशी शिंकली आणि तो रोलही नवाजच्या हातून निसटला. नाही तर आज मुख्य भूमिकेत फोटोग्राफरची भूमिका साकारणारा नवाज कारकिर्दीच्या सुरुवातीलाच कॅमेरा हातात घेऊन पडद्यावर झळकला असता. 


काॅलेज गर्लची भूमिका

कॅमेरा आणि फोटोग्राफीच्या रोलबाबतचं आपलं हे अनोखं नातं नवाजनं स्वत:च एका इव्हेन्टमध्ये सांगितलं. चांगले फोटो काढूनही त्यावेळी कशा प्रकारे आपल्याला डावलण्यात आलं होतं ते नवाजनं अगदी संयमपणं सांगितलं. त्यावेळी नवाजची फोटोग्राफर बनण्याची संधी हुकली. कदाचित तो छोटासा रोल असावा, पण आता मुख्य भूमिकेत तो फोटोग्राफी करताना दिसणार आहे हे विशेष. मुंबईतील धारावीच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचं कथानक आधारलेलं आहे. सान्यानं या सिनेमात अभ्यासात हुषार असलेल्या काॅलेज गर्लची भूमिका साकारली आहे. सनडांस फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झालेला तसंच बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आलेला हा सिनेमा १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; विरोधी पक्षनेत्याच्या मुलाच्या हाती ‘कमळ’संबंधित विषय
ताज्या बातम्या