Advertisement

'साहो'साठी प्रभासनं घटवलं वजन

'साहो'साठी वजन घटवण्याची प्रक्रिया प्रभासनं प्रॅापर योजनेद्वारे अंमलात आणली. यासाठी त्याचा विशेष डाएट प्लॅन बनवण्यात आला होता. याखेरीज प्रभासनं जिममध्येही अतिरीक्त मेहनत घेत घाम गाळल्याचं समजतं.

'साहो'साठी प्रभासनं घटवलं वजन
SHARES

'बाहुबली'च्या यशानंतर अभिनेता प्रभास खऱ्या अर्थानं नावारूपाला आला आहे. या सिनेमात दुहेरी भूमिका साकारणारा प्रभास मागील बऱ्याच दिवसांपासून 'साहो' या सिनेमामुळं पुन्हा प्रकाशझोतात आहे. या सिनेमासाठी त्यानं वजनही घटवलं आहे.


अनोखी स्टाइल

अलिकडेच 'साहो' सिनेमाच्या निर्मात्यांनी 'शेड्स ऑफ साहो' या सिरीज अंतर्गत सिनेमाच्या मेकिंगची झलक दाखवणारी सिरीज रिलीज केली होती. या सिरीजमध्ये प्रभासचा स्टायलिश लुक पाहायला मिळतो. यातील प्रभासची अनोखी स्टाइल लक्षवेधी आहे. या स्टायलिश लुकसाठी प्रभासनं खूप मेहनत घेतल्याचं समजतं. 'साहो'मधील व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी जवळजवळ सात ते आठ किलो वजन घटवल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.


अतिरीक्त मेहनत

'साहो'साठी वजन घटवण्याची प्रक्रिया प्रभासनं प्रॅापर योजनेद्वारे अंमलात आणली. यासाठी त्याचा विशेष डाएट प्लॅन बनवण्यात आला होता. याखेरीज प्रभासनं जिममध्येही अतिरीक्त मेहनत घेत घाम गाळल्याचं समजतं. 'बाहुबली'नंतर सर्वांच्याच प्रभासकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षांच्या ओझ्याखाली न दबता मेहनत घेऊन प्रभास काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे. 'बाहुबली'प्रमाणेच इतर सिनेमांमधील आपल्या व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या स्मरणात राहाव्यात असं त्याला वाटत आहे. यासाठी तो कोणत्याही प्रकारची मेहनत घ्यायला तयार असल्याचंच यातून जाणवतं.


पहिला बहुभाषिक सिनेमा

या सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय या सिनेमात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॅाफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे आदी हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. अॅक्शन-थ्रीलर असलेला हा भारतातील पहिला बहुभाषिक सिनेमा असल्याचं सांगितलं जात आहे. हा सिनेमा एकाच वेळी हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये शूट करण्यात येत आहे. सुजीत द्वारा दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती गुलशन कुमार यांच्या टी-सिरीज, भूषण कुमार आणि युव्ही क्रिऐशन प्रॅाडक्शनच्या संयुक्त विद्यमानं करण्यात येत आहे.


नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत

देश-विदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेल्या या सिनेमासाठी गीतकार अमिताभ भट्टाचार्य यांनी गीतलेखन केलं आहे. शंकर-एहसान-लॅाय या संगीतकार त्रिकूटानं या गीतांना स्वरसाज चढवला आहे. साबू सिरील प्रॅाडक्शन डिझायनर असून, सिनेमॅटोग्राफर मेढी यांनी छायांकन केलं आहे. अनुभवी संकलक श्रीकर प्रसाद यांनी या सिनेमाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे.



हेही वाचा -

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!

हा पहा मुक्ताचा डॅशिंग लुक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा