Advertisement

हा पहा मुक्ताचा डॅशिंग लुक

मुक्ता आता कोणत्या रूपात दिसणार याची प्रेक्षकांइतकीच उत्सुकता सिनेसृष्टीलाही लागली होती. मुक्तानं स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिनं नुकतंच आपल्या 'बंदिशाळा' या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर आपल्या फेसबुकवर शेअर केलं आहे.

हा पहा मुक्ताचा डॅशिंग लुक
SHARES

रंगभूमीपासून सिनेमाच्या पडद्यापर्यंत मुक्ता बर्वेनं नेहमीच विविधांगी भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येत तिनं नवनवीन आव्हानंही स्वीकारली आहेत. आता 'बंदिशाळा' या आगामी मराठी सिनेमात मुक्ताचा डॅशिंग लुक पाहायला मिळणार आहे.


फेसबुकवर शेअर

मुक्तानं आजवर मराठीतील सर्वच आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं आहे. 'डबल सीट' मध्ये ती अंकुश चौधरीसोबत दिसली. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या स्वप्नील जोशीसोबतच्या मुक्ताच्या 'मुंबई-पुणे-मुंबई ३' या सिनेमानंही बॅाक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळं मुक्ता आता कोणत्या रूपात दिसणार याची प्रेक्षकांइतकीच उत्सुकता सिनेसृष्टीलाही लागली होती. मुक्तानं स्वत:च या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिनं नुकतंच आपल्या 'बंदिशाळा' या आगामी सिनेमाचं मोशन पोस्टर आपल्या फेसबुकवर शेअर केलं आहे.


कारागृहावर कथानक

या मोशन पोस्टरमध्ये मुक्ताचा बदललेला नूर आणि सूर पाहायला मिळतो. 'बंदिशाळा' या सिनेमात ती एका डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचं मोशन पोस्टरमध्ये पाहायला मिळतं. गुंड आणि भाईंना बाखोटीला पकडून धिंड काढणारी, गुंडांना लाथा-बुक्क्यांनी मारणारी मुक्ता या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं शीर्षक आणि मोशन पोस्टरमधील कारागृहाबाहेरील दृश्यं पाहिल्यावर या सिनेमाचं कथानक कारागृहावर आधारित असल्याचं जाणवतं.


१० मे रोजी प्रदर्शित

मुक्ताची मुख्य भूमिका असलेला 'बंदिशाळा' हा सिनेमा येत्या १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच अभिनेता ऋतिक रोशननं मुक्ताच्या 'स्माइल प्लीज' या मराठी सिनेमाचा मुहूर्त केला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रम फडणीस करणार आहे. याशिवाय संगीत दिग्दर्शनाकडून सिनेदिग्दर्शनाकडे वळलेल्या डॅा. सलील कुलकर्णी यांच्या 'वेडींगचा शिनेमा' या आगामी मराठी सिनेमातही मुक्ता एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे, पण या सर्वांपेक्षा मुक्ताचा 'बंदिशाळा'मधील लुक खूप डॅशिंग आहे.



हेही वाचा - 

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!

एप्रिलमध्ये रंगणार संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा