Advertisement

एप्रिलमध्ये रंगणार संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव

संस्कृती कलादर्पण पुरस्काराचं यंदा १९ वं वर्ष आहे. सोहळ्याच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला संस्कृती कलादर्पणचा त्रिदिवसीय नाट्य महोत्सव सोहळा ७ एप्रिल ते ९ एप्रिल पार पडणार आहे.

एप्रिलमध्ये रंगणार संस्कृती कलादर्पण नाट्यमहोत्सव
SHARES

दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सिनेसृष्टीतील कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत संस्कृती कलादर्पण नाट्य आणि सिने पुरस्कार सोहळा रंगणार आहे. नाट्यरसिकांना एप्रिलमध्ये या सोहळ्यातील नाट्यमहोत्सवाचा आनंद लुटता येईल.


२४ नाटकांचा सहभाग

संस्कृती कलादर्पण पुरस्काराचं यंदा १९ वं वर्ष आहे. सोहळ्याच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष-संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांच्या संकल्पनेतून साकारलेला संस्कृती कलादर्पणचा त्रिदिवसीय नाट्य महोत्सव सोहळा ७ एप्रिल ते ९ एप्रिलला पार पडणार आहे. या काळात माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहात विविध नाटकांचे प्रयोग दाखवण्यात येतील. यंदाच्या स्पर्धेत एकूण २४ नाटकांनी सहभाग घेतला होता. त्यातून अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड करण्यात आली आहे.


निकाल एप्रिलमध्ये

'गलतीसे मिस्टेक', 'तिला काही सांगायचं आहे', 'दादा एक गुड न्यूज आहे', 'सोयरे सकळ', 'गुमनाम है कोई' या नाटकांचा अंतिम फेरीमध्ये समावेश करण्यात आला आहे. नाट्य महोत्सवातील पहिलं नाट्य पुष्प 'गलतीसे मिस्टेक' या नाटकानं गुंफलं जाणार असून, 'गुमनाम है कोई' या नाटकानं या सोहळ्याची सांगता करण्यात येईल. होणार आहे. प्रेक्षकांना मतदानाद्वारे या पाच नाटकांमधील सर्वोत्कृष्ट नाटक निवडण्याचा अधिकार असणार आहे. या स्पर्धेचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल.


रोहिणी निनावे परीक्षक

७ एप्रिल रात्रौ ८ वाजता गलतीसे मिस्टेक, ८ एप्रिल दुपारी ४.०० वा. तिला काही सांगायचे आहे, ८ एप्रिल रात्रौ ८.०० वा. दादा एक गुड न्यूज आहे, ९ एप्रिल दुपारी ४.०० वा. सोयरे सकळ, ९ एप्रिल रात्रौ ८.०० वा. गुमनाम है कोई ही नाटकं दाखवण्यात येतील. विजय गोखले, प्रमोद पवार, गुरुदत्त लाड आणि रोहिणी निनावे यांनी या नाट्यमहोत्सवाच्या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिलं आहे.हेही वाचा - 

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!

शिक्षकांची निवडणूक कामातून सुटकासंबंधित विषय
Advertisement