अभिनेता रणवीर शौरीला कोरोनाची लागण झाली आहे. रणवीरनं बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रणवीरनं स्वतःला क्वारंटाइन केलं आहे.
रणवीरनं पोस्ट शेअर करताना लिहिलं की, “मला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. माझ्यात सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे मी क्वारंटाइन झालो आहे.”
I have tested positive for #COVID19. Symptoms are mild. Am quarantining.
— Ranvir Shorey (@RanvirShorey) February 17, 2021
रणवीरपूर्वी बॉलिवूडचे अनेक स्टार्स कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यासह कनिका कपूर, मोरानी कुटुंब, नीतू कपूर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, वरुण धवन, कृती सेनन, रकुलप्रीत सिंग, तमन्ना भाटिया, तनाज करीम, हर्षवर्धन राणे यासारखे अनेक सेलिब्रिटींची कोविड १९ ची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
रणवीर शौरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'मेट्रो पार्क २' मध्ये दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अलीकडेच रिलीज झालेल्या 'लूटकेस' या चित्रपटात तो झळकला होता. याशिवाय ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटातही तो झळकला होता. चित्रपटांव्यतिरिक्त रणवीर वेब सीरिजमध्येही अॅक्टिव आहे. तो 'रंगबाज', 'मेट्रो पार्क' यासारख्या वेब सीरिजमध्ये झळकला.
हेही वाचा