Advertisement

'झिरो'चं शुटिंग थेट नासामध्ये


'झिरो'चं शुटिंग थेट नासामध्ये
SHARES

अमेरिकेची राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाचं सर्वांनाच अप्रूप असतं. तसं ते बॉलिवुडलाही आहे. बॉलिवुडमध्ये आत्तापर्यंत अभिनेता शाहरूख खानने 'स्वदेस' चित्रपटासाठी नासामध्ये शुटिंग केलं होतं. आता त्या यादीमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. आणि ते नाव म्हणजे मिसेस कोहली अर्थात अनुष्का शर्मा! विशेष म्हणजे अनुष्का शाहरूखसोबतच नासामध्ये शुटिंग करणार आहे.


..आणि शाहरूख-अनुष्कानं गाठलं नासा

शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या आगामी 'झिरो' या सिनेमाचं शुटिंग सध्या सुरू आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. याच सिनेमाच्या क्लायमॅक्सचं शुटिंग नासामध्ये होणार आहे. यासाठी हे दोघे इतर क्रू मेंबर्ससोबत नासासाठी रवानाही झाल्याचं सांगितलं जात आहे.


४५ दिवस नासामध्ये मुक्काम

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'झिरो'ची संपूर्ण टीम तब्बल ४५ दिवस नासामध्ये रहाणार आहे. सध्या अमेरिकेच्या हंट्सविलामधल्या स्पेस अॅण्ड रॉकेट सेंटरमध्ये शुटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या काही दृश्यांसाठी नासाच्या रॉकेट मॉडेल्सचाही वापर केला जाणार आहे.


शाहरूखची विशेष भूमिका

या चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारत आहे. ही व्यक्ती हुशार आणि गंमतीशीर आहे. यामध्ये शाहरूख आणि अनुष्कासोबतच कतरिना कैफसुद्धा महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारत आहे.



हेही वाचा

'ज्युनिअर' अजय देवगणचं यंग इंडियाला चॅलेंज!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा