Advertisement

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मल्टीस्टारर चित्रपट, वेलकम टू द जंगलसाठी तो शूटिंग करून घरी गेला. त्यानंतर त्याला त्रास जाणवू लागला.

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका
SHARES

अभिनेता श्रेयस तळपदे (वय ४७) याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी शूट संपल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले. 

श्रेयस तळपदेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.

हिंदुस्थान टाईन्सच्या वृत्तानुसार, श्रेयस तळपदे पूर्णपणे बरे होते. मल्टीस्टारर चित्रपट, वेलकम टू द जंगलसाठी संपूर्ण दिवस शूट केले. “त्याने दिवसभर चित्रीकरण केले, तो पूर्णपणे ठीक होता आणि सेटवर सर्वांशी विनोद करत होता. त्याने थोडेसे अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला,” अशी माहिती सूत्राने वृत्तपत्राला दिली.

रुग्णालयाने पुष्टी केली, "श्रेयस तळपदे दाखल आहेत. त्यांना संध्याकाळी उशिरा आणण्यात आले. त्यांच्या प्रकृतीच्या अपडेटची प्रतीक्षा आहे."

श्रेयस तळपदे आता बरा असल्याची माहिती श्रेयसच्या टीमकडून देण्यात आली आहे. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याला मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं श्रेयसच्या सेक्रेटरीने सांगितलं आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा