Advertisement

वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांना कोरोनाची लागण

‘जुग जुग जियो’ आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या चंदीगडमध्ये सुरू आहे. मात्र आता चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.

वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांना कोरोनाची लागण
SHARES

जुग जियो’ या चित्रपटातील मुख्य कलाकार वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वृत्तानुसार, या चौघांचाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट गुरुवारी सायंकाळी आला आहे.

‘जुग जुग जियो’ आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सध्या चंदीगडमध्ये सुरू आहे. मात्र आता चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. कारण सेटवरील मुख्य कलाकारांसोबत  काही क्रू मेंबर्सना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे.

सध्या शूटिंग थांबवण्यात आलं आहे. आज संध्याकाळपर्यंत चित्रपटाच्या टीमकडून याबाबत अधिकृत विधान केलं जाण्याची शक्यता आहे. अलीकडेचा अभिनेता आणि भाजपचे खासदार सनी देओल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय.

३० एप्रिल रोजी ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांचा 'जुग-जुग जियो' हा पहिला चित्रपट आहे. शूटसाठी रवाना होताना नीतू यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करताना लिहिलं होतं की, "या कठीण काळातली माझी पहिली फ्लाइट. मी या प्रवासाबद्दल थोडी घाबरले आहे." पुढे त्यांनी ऋषी कपूर यांची आठवण करुन लिहिले, "कपूर साहेब, माझा हात धरायला तुम्ही इथे नाहीत, पण मला माहित आहे की तुम्ही कायम माझ्याबरोबर आहात."

'जुग-जुग जियो'मध्ये नीतू, वरुण आणि किआराशिवाय अनिल कपूर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'गुड न्यूज' फेम दिग्दर्शक राज मेहता करत आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.हेही वाचा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेनं बिग बॉस, मिर्झापूरला टाकलं मागे

२०२१ मध्ये प्रदर्शित होणार 'अपने २', देओल कुटुंबातील ३ पिढ्या झळकणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement