Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

२०२१ मध्ये प्रदर्शित होणार 'अपने २', देओल कुटुंबातील ३ पिढ्या झळकणार

अपने’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘अपने २’ ची तयारी सुरू केली असल्याची घोषणा देओल कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

२०२१ मध्ये प्रदर्शित होणार 'अपने २', देओल कुटुंबातील ३ पिढ्या झळकणार
SHARES

गुरु नानक जयंतीनिमित्त देओल कुटुंबीयांकडून त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अपने’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘अपने २’ ची तयारी सुरू केली असल्याची घोषणा देओल कुटुंबियांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

या चित्रपटात देओल कुटूंबातील तीन पिढ्या - धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि करण देओल एकत्र दिसणार आहेत.

अपने 2 मध्येही बॉक्सरची झलक दिसेल. पण कहाणी पूर्णपणे वेगळे असेल. सध्याच्या पिढीला लक्षात ठेवून याची पटकथा लिहिली गेली आहे. सध्या आम्ही 'अपने २'ची घोषणा करत आहोत. शूटिंग मार्च २०२१ मध्ये सुरू होईल आणि हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल.

अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळी २०२१ मध्ये प्रदर्शित होईल. 'अपने' हा चित्रपट लोकांना चांगलाच आवडला. लोक चित्रपटात दाखवलेल्या प्रत्येक भावनेशी जोडले गेले आणि म्हणूनच आम्ही त्याचा सिक्वेल घेऊन येत आहोत. या चित्रपटात आम्ही आजच्या पिढीच्या भावना दर्शवण्याचा प्रयत्न करू. आजचे प्रेक्षक जे बघू इच्छितात ते या चित्रपटात दिसेल. मला खात्री आहे की आम्हाला पहिल्या चित्रपटात मिळालेले प्रेम या सिक्वेलमध्येही मिळेल, असं अनिल शर्मा यांनी स्पष्ट केलं.

२००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘अपने’ या चित्रपटात धर्मेंद्र यांनी एका बॉक्सरची भूमिका साकारली होती. त्यांची मुले अंगद (सनी देओल) आणि करण (बॉबी देओल) यांना वर्ल्ड चॅम्पिअन बॉक्सर बनवण्याचे त्यांचे स्वप्न असते. या चित्रपटात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी व्यतिरिक्त शिल्पा शेट्टी, कतरिना कैफ, दिव्या दत्ता, किरण खेर, जावेद शेख, परवीन डबास आणि आर्यन वैद्य यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.हेही वाचा

डिसेंबरमध्ये 'या' ५ वेब सिरीजचा धमाका

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय नानावटीत दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा