Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय नानावटीत दाखल

५२ वर्षीय राहुल रॉयला 'कारगिल'मध्ये गलवान व्हॅलीवर बेस्ड चित्रपट 'एलएसी'ची शूटिंगदरम्यान, ब्रेन स्ट्रोकचा झटका आला.

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉय नानावटीत दाखल
SHARES

१०९० मधील म्यूजिकल हिट 'आशिकी'मधून लोकप्रिय झालेला अभिनेता राहुल रॉयला मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. ५२ वर्षीय राहुल रॉयला 'कारगिल'मध्ये गलवान व्हॅलीवर बेस्ड चित्रपट 'एलएसी'ची शूटिंगदरम्यान, ब्रेन स्ट्रोकचा झटका आला.

यानंतर तात्काळ त्यांना श्रीनगरमधील मिलिट्री हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर, पुढील उपचारासाठी मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये आणलं असता त्याला आयसीयूत ठेवण्यात आलं आहे.

राहुलसोबत 'एलएसी'ची शूटिंग करत असलेला अभिनेता निशांत सिंह मलकानीनं एका वृत्तपत्राला सांगितलं की, "काही दिवसांपूर्वी शूटिंगदरम्यान राहुल आणि इतर टीम मेंबर्सला समजलं की, राहुलला निट बोलता येत नाहीये. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर टीमनं त्यांना मिलिट्री हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे राहुल यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचं निदान झालं. इथून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणलं."

राहुल रॉयच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, त्याच्या मेंदूच्या डाव्या भागात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. तो बरा होण्यासाठी वेळ लागू शकतो. 'LAC-लिव्ह द बॅटल' या चित्रपटाचं शूटिंग खूप उंचीवर सुरू होतं. त्यामुळे इथं ऑक्सिजनची कमतरता होती आणि टीम सदस्यांनाही श्वास घेण्यास त्रास जाणवत होता.

राहुल रॉय यानं १९० साली 'आशिकी' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. या चित्रपटामुळे त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की त्यानं यानंतर थेट ४७ चित्रपट साईन केले. पण 'आशिकी' नंतर राहुल रॉयची जादू कमी झाली. आणि तो प्रसिद्धीपासून दूरावला. यानंतर बिग बॉसचा सिजन १ जिंकल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला. मात्र, बिग बॉसनंतरही त्यांची जादू फार चालू शकली नाही.हेही वाचा

म्हणून मी हिरो, कंगनाचा ठाकरे सरकारला टोला

'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या पुढील सीझनमध्ये नोराची परीक्षक म्हणून वर्णी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा