Advertisement

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?

अभिनेत्री क्रिती सनोन आता एका 'पटियाला' कॅामेडी भूमिकेत दिसणार आहे. कारण या चित्रपटाचं शीर्षकच 'अर्जुन पटियाला' असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?
SHARES

अभिनेत्री क्रिती सनोन आता एका 'पटियाला' कॅामेडी भूमिकेत दिसणार आहे. कारण या चित्रपटाचं शीर्षकच 'अर्जुन पटियाला' असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.


मैं दिवाना तेरा...

आपल्या मखमली आवाजानं ब्लॅक अँड व्हाईटचं विश्वही रंगीन करणाऱ्या रेडियो किंग अमिन सयानी यांच्या निवेदनशैलीत 'अर्जुन पटियाला'चा ट्रेलर सुरू होतो. या चित्रपटात कॅामेडीच्या जोडीला अॅक्शन, ड्रामा, रोमांससह मनोरंजनाचे सर्व मसाले ठासून भरल्याचं ट्रेलर पाहिल्यावर जाणवतं. मुख्य भूमिकेत क्रिती सनोन आणि दिलजीत दोसांज असून, या चित्रपटाच्या निमित्तानं हे दोन्ही कलाकार प्रथमच एकत्र आले आहेत. त्यांच्या जोडीला ओनिडा सिंगच्या भूमिकेत वरुण शर्मा धमाल करताना दिसणार आहे. कृती-दिलजीतवर चित्रीत करण्यात आलेलं 'मैं दिवाना तेरा...' हे गाणंही लक्ष वेधून घेतं.


सनी लिओनीचं आयटम साँग

शीर्षक भूमिकेत असलेला दिलजीत आणि टीव्ही पत्रकाराच्या भूमिकेत रीतू रंधावा ही व्यक्तिरेखा साकारणारी क्रिती या जोडीची केमिस्ट्री या चित्रपटासाठी महत्त्वाची ठरणार आहे. क्रितीच्या 'लुका छिपी' या चित्रपटानं बॅाक्स आॅफिसवर आश्चर्यकारक यश मिळवल्यानंतर 'अर्जुन पटियाला' हा चित्रपटही तोच कित्ता गिरवेल अशी तिच्या चाहत्यांना आशा वाटते. रोनित रॅाय, सीमा पाहवा, मोहम्मद झशीन अयुब यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. याखेरीज सनी लिओनीच्या आयटम साँगचा तडकाही देण्यात आला आहे. रितेश शाह आणि संदिप लेझेल यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित जुगराज यांनी केलं आहे.


लिंक - https://www.youtube.com/watch?v=nR7ETMS7Eo0



हेही वाचा-

'फिक्सर’ शुटिंग मारहाण: अभिनेत्री माही गिल आणि क्रू मेंबर्सनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

परागच्या मनात आहे तरी काय?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा