Advertisement

ऐश्वर्या रजनीकांत-धनुषचे लग्न मोडले, धनुष म्हणाला...

धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणत विभक्त होण्याची घोषणा केली.

ऐश्वर्या रजनीकांत-धनुषचे लग्न मोडले, धनुष म्हणाला...
SHARES

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणत विभक्त होण्याची घोषणा केली. धनुष हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. ऐश्वर्या एक चित्रपट दिग्दर्शिका आहे.

घटस्फोटाबद्दल धनुषनं सोशल मीडियावर लिहिलं की, आम्ही १८ वर्षे मैत्री, कपल, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक म्हणून ग्रोथ, समजूतदारपणा आणि भागीदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. आज आम्ही जिथं उभे आहोत तिथून आमचे मार्ग वेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी कपल म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा.

इन्स्टाग्रामवर अशीच एक पोस्ट शेअर करत ऐश्वर्यानं लिहिलं की, कॅप्शनची गरज नाही... फक्त तुमची समज आणि तुमच्या प्रेमाची गरज!

साऊथ सिनेसृष्टीशी संबंधित लोकांनुसार, धनुषचे त्याच्या सह-अभिनेत्रींसोबतच्या लिंकअपच्या बातम्या हे देखील त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होण्यामागील एक मोठे कारण बनले.

अमाला पॉल, श्रुती हासन आणि तृषा कृष्णन या दाक्षिणात्य अभिनेत्रींशी धनुषचे नावे जोडले गेले होते. ज्यामुळे बरेच वादही झाले होते. २०२० मध्ये त्याचे नाव श्रुतीसोबत जोडले गेले.

तृषा कृष्णन आणि धनुष इंडस्ट्रीत चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. लिंकअपच्या बातम्यांमुळे धनुष-ऐश्वर्या यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे अमाला हिनेदेखील धनुषसोबतचे अफेअर या सर्व निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते.

मात्र त्यावेळी धनुष- अमाला यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. तर चित्रपट ‘3’ च्या शूटिंगदरम्यान श्रुती आणि धनुष यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन धनुषची पत्नी ऐश्वर्यानं केलं होतं.

रजनीकांत यांची मुलगी असूनही ऐश्वर्याला साऊथ इंडस्ट्रीत जेवढे काम मिळायला हवे होते तेवढे मिळत नाहीये. पहिला चित्रपट '3' नंतर तिच्याकडे काम नव्हते. याच चित्रपटात धनुषनं संगीतकार अनिरुद्ध याच्यासह मिळून कोलावेरी-डी हे गाणं गायलं होतं. जे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चार्टबस्टर ठरले होते. या चित्रपटात धनुषसोबत श्रुती हासननं काम केलं होतं. मात्र '3' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

ऐश्वर्याला तिचे बुडत चाललेले करिअर वाचवण्यासाठी साऊथ फिल्म इंडस्ट्रीऐवजी बॉलिवूडमध्ये काम करायचे आहे. त्यामुळे तिचा बराचसा वेळही मुंबईतच जातो. अशा परिस्थितीत दोघांनाही एकत्र राहणे कठीण झाले होते. मुंबईत अनेक यशस्वी महिला दिग्दर्शिका आहेत आणि बॉलिवूडमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव कमी आहे, त्यामुळे ऐश्वर्या तिचे करिअर इथेच स्थिरावू पाहत आहे.

धनुष आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा येण्यामागील एक कारण म्हणजे धनुष एकामागून एक चित्रपट साईन करत आहे, त्याचा बराचसा वेळ शूटिंग आणि घराबाहेर जातो. नात्याला आणि घराला तो जास्त वेळ देऊ शकत नाही. दाक्षिणात्य इंडस्ट्रीशिवाय त्याला बॉलिवूडमधूनही अनेक चित्रपट मिळत आहेत.

अलीकडेच अक्षय कुमार-सारा अली खानसोबत आलेल्या 'अतरंगी रे' या चित्रपटातील त्याच्या कामाचे कौतुक झाले आहे. 'अतरंगी रे'पूर्वी धनुषनं बॉलिवूडच्या 'रांझना' आणि 'शमिताभ'मध्येही काम केलं आहे. त्याची इमेज पॅन इंडिया स्टार अशी होत आहे.हेही वाचा

विनोदवीर कपील शर्मावर लवकरच बनणार बायोपिक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा