Advertisement

विनोदवीर कपील शर्मावर लवकरच बनणार बायोपिक

विनोदवीर कपिल शर्माचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विनोदवीर कपील शर्मावर लवकरच बनणार बायोपिक
SHARES

विनोदवीर कपिल शर्माचा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्मानं प्रचंड मेहनतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन क्षेत्रात कोणीही गॉडफादर नसताना कपिलं इथंपर्यंत बाजी मारली आहे. त्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

आता यशाच्या शिखरावर असलेल्या कपिल शर्मानं आयुष्यात अनेक चढ- उतार पाहिले आहेत. आता त्यांची ही स्ट्रगल स्टोरी मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार आहे.

कपिल शर्माच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. कपिल शर्माच्या जीवनावर तयार होत असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘फनकार’ असं असणार आहे. याची घोषणा निर्माता महावीर जैन यांनी नुकतीच केली आहे. कपिल शर्माच्या चाहत्यासाठी त्याच्या बायोपिकची घोषणा ही अत्यंत आनंदाची बातमी आहे.

कपिल शर्माच्या जीवनावर आधारित ‘फनकार’ या बायोपिकचं दिग्दर्शन मृगदीप सिंह लांबा करणार आहे. त्यांनी याआधी ‘फुकरे’ चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. याच चित्रपटातून मृगदीप सिंह लांबा यांना दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख मिळाली होती.

दरम्यान या चित्रपटात कपिलची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा अद्याप झालेला नाही. कदाचित कपिल शर्मा स्वतःच त्याच्या बायोपिकमध्ये काम करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.हेही वाचा

अखेर प्रतिक्षा संपली, पुष्पा 'या' दिवशी अॅमेझॉनवर हिंदीत प्रदर्शित

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा