Advertisement

खिलाडी अक्षय कुमार ठरला बॉक्स ऑफिसचा किंग

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा नवा बादशाह बनला आहे.

खिलाडी अक्षय कुमार ठरला बॉक्स ऑफिसचा किंग
SHARES

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा नवा बादशाह बनला आहे. अक्षयनं सुपरहिट चित्रपट देत कमाईमध्ये आपलं स्थान अव्वल स्थान ठेवलं आहे. २०१९ मध्ये अक्षय कुमारच्या 'केसरी’, 'मिशन मंगल’, 'हाऊसफुल्ल ४' आणि 'गुड न्यूज' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत. या चित्रपटांच्या माध्यमातून अक्षय कुमारनं तब्बल ६६५.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

कोटींची कमाई

२०१९ या वर्षाच्या सुरुवातीला अक्षय कुमारचा बहुचर्चित 'केसरी' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सुमारे १५१.८७ कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर अक्षय कुमार आणि विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असणारा 'मिशन मंगल' चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये देशाच्या मंगलयान मिशनची कथा दाखवण्यात आली. या चित्रपटानं सुरुवातीच्या काही दिवसात १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करत सुमारे १९२.६६ कोटी रुपयांची कमाई केली.

सर्वाधिक कमाई

हाऊसफुल्ल सीरिजमधील चौथ्या भागात अक्षय कुमार झळकला होता. मोठी स्टारकास्ट असणाऱ्या 'हाऊसफुल्ल ४'नं बॉक्स ऑफिसवर जोरदार धडक देत सुमारे २०५.६० कोटी रुपयांची कमाई केली. हाऊसफुल्ल ४ हा चित्रपट २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. २०१९ या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'गु़ड न्यूज' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या ६ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ११५.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

६६५.८९ कोटींची कमाई

अक्षय कुमारच्या या ४ ही सुपरहिट चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाई ६६५.८९ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. आगामी २०२० मध्ये अक्षय कुमार चाहत्यांसाठी उत्तमोत्तम चित्रपट घेऊन येत आहे. आगामी काळात अक्षय कुमारच्या भूमिका असलेले सूर्यवंशी, पृथ्वीराज, लक्ष्मी बॉम्ब आणि बच्चन पांडे हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळं २०२० या वर्षातही अक्ष बॉक्स ऑफिसचा किंग असणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

खातेवाटपावरून चव्हाण, पवार यांच्यात खडाजंगी?

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या वकिला विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा